इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, १५ जून, २०१२

जिल्ह्यातील उद्योगाचा विकास अधिक गतीने होईल -- देशमुख


कोल्हापूर दि.14:कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास भविष्यकाळात अधीक गतीने होईल, अशी आशा जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज व्यक्त केली.
श्री. देशमुख यांना जिल्हा उद्योग केंद्ग आणि जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांतर्फे निरोप देण्यात आला. यावेळी श्री. देशमुख बोलत होते. येथील हॉटेल वृषाली येथे हा कार्यक्रम झाला.
श्री. देशमुख म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांत उपक्रमशीलता आहे. या उपक्रमशीलतेच्या जोरावर येथील उद्योजकांनी विकास साधला आहे. त्यांना पाठबळ देणे आणि शासकीय प्रक्रीया गतिमान करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात विविध प्रकारच्या क्लस्टरना मंजूरी मिळाली आहे. या क्लष्टरच्या माध्यमातून जिल्हयात विविध भागात रोजगार निर्मिती व्हावी आणि त्या माध्यमातून विकास साधला जाईल.
      अध्यक्षस्थानी उद्योगपती रामप्रसाद झंवर होते. यावेळी सौ. किशोरी आवाडे, चंद्गशेखर नाईक, भूपाल शेटे, डॉ. पी. एन. भोसले, बी. एस. घाटगे, श्री. अकिवाटे, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. जिल्हा उद्योग केंद्गाचे महाव्यवस्थापक गो. रा. जांगडा यांनी संयोजन केले. यावेळी अजित आजरी, अशोकराव दुधाणे, रवींद्ग ओबेरॉय, नाबार्डचे ए. ए. कांबळे आदि उपस्थित होते. प्रदीप व्हरांबळे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.