इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

गॅस कंपन्यांनी गॅस वितरण वाहनावर दैनंदिन दर फलक लावावेत -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : गॅस कंपन्यांनी सर्व गॅस सिंलेडर वितरण वाहनांवर दैनंदिन दर फलक लावावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

दि. 27 जानेवारी रोजी झालेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मागील ग्राहक संरक्षण बैठकीमध्ये प्राप्त झालेल्या 17 तक्रार अर्जाबाबत चर्चा करुन निपटारा करण्यात आला. पोलीस विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, सहाय नियंत्रण वैधमापन शास्त्र, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ या विभागांबाबतच्या अर्जाबाबत चर्चा करुन निराकरण करण्यात आले.

बैठकीत नवीन 10 अर्ज प्राप्त झाले असून या अर्जांबाबतचे निराकरण पुढील बैठकीत केले जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य अरुण यादव यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.