कोल्हापूर,
दि. 8 (जिमाका): 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील 80 वर्षावरील व
दिव्यांग मतदारांकरिता टपाली मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मतदारांकरिता निवडणूक कार्यालयाकडून 11 एप्रिल पर्यंत एकूण 12 पथके नेमण्यात आली
आहेत. ही पथके नेमून दिलेल्या भागामध्ये (सकाळी 9.00 ते सायंकाळी 06.00
वाजेपर्यंत) कार्यान्वित असून ज्या 80 वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी आपला 12 D
चा फॉर्म भरुन दिला आहे व तो पात्र झाला आहे त्या मतदारांनी टपाली मतदान सुविधेचा
लाभ घेवून मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी
(महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी केले आहे.
ज्या मतदारांनी टपाली मतदान केले आहे त्या मतदारांना दि. 12 एप्रिल
रोजी होणा-या मतदानादिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करता येणार नाही,
तरी ज्या मतदारांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, त्यांनी
त्यांच्या घरी येणा-या टपाली मतदान सुविधा पथकाकडे मतदान करावे, असेही श्री.
क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.