कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : शालांतपूर्व दिव्यांग
शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून डीबीटी प्रणालीव्दारे राबविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील
जास्तीत-जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा
लाभ मिळावा याकरिता प्राथमिक, माध्यमिक तसेच दिव्यांगाच्या विशेष शाळांनी पात्र
विद्यार्थ्यांबाबतीत त्वरीत विहीत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण
अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
संबधित शाळांनी करावयाची कार्यवाही
पुढीलप्रमाणे -
शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ
घेणाऱ्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र यूडीआयडी या
संगणकीय प्रणालीव्दारे काढण्याबाबत कार्यवाही करावी. दिव्यांग विद्यार्थ्यांचे
आधार कार्ड तसेच
आधार कार्ड संलग्न बँक खाते काढण्याची कार्यवाही करावी, असे
निर्देश श्री. घाटे यांनी दिले आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.