मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन

 





        कोल्हापूर दि. ५  ( जिमाका ) :  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचे आज सकाळी १० .१५ वा . कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले . पालकमंत्री सतेज पाटील तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

       श्री कोश्यारी हे कोल्हापूर येथे दि .४ ते ६ एप्रिल दरम्यान संपन्न होणाऱ्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी तसेच शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षांत समारंभात घोषीत करण्यात आलेली राष्ट्रपती व कुलपती यांची सुवर्णपदके संबंधितांना प्रदान करण्यासाठी आले आहेत.

         यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे , शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी .टी. शिर्के , प्रभारी कुलसचिव डॉ . व्ही .एन . शिंदे , विमानतळ विकास प्राधिकरण संचालक कमल कटारिया आदी उपस्थित होते. 

0 0 0 0 0 0

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.