इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

पहल योजना आता गिनीज वल्ड रेकॉर्डमध्ये
14 कोटी 10 लाख गॅसधारकांची  253 कोटींची बससिडी ग्राहकांच्या खात्यात जमा

     कोल्हापूर, दि. 24 :  केंद्र शासनाच्या पेट्रोलियम  नॅचरल गॅस मंत्रालयातर्फे सुरु करण्यात आलेल्या पहल योजनेचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाल्याचे कोल्हापूर सांगली (एलपीजी) विभागाचे सहायक व्यवस्थापक एम मोहन राव यांनी सांगितले.
सहायक व्यवस्थापक एम मोहन राव यांनी पेट्रोलियम नॅचरल गॅस मंत्रालय, भारत सरकार यांनी डीबीटीएल जी पहल ( प्रत्यक्ष हस्तांतरीत लाभ ) या प्रचलित नावाने 15 नोव्हेंबर 2014 पासून देशातील 54 जिल्ह्यात उर्वरित देशात 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली. पहल योजनेखाली प्रत्यक्ष गॅस ग्राहकांनी आपला आधार नंबर त्यांच्या गॅस वितरकांकडे त्याच्या बँक खात्याशी संलग्न करावा लागतो. गॅस वितरकांकडे गॅस नंबरशी संलग्न केल्यानंतर त्याच्याही बँक खात्यात गॅस अनुदान जमा होते. पहल योजना गॅस ग्राहकांना गॅस सबसिडी सुरळीतपणे त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी सरकारकडूनही त्याची अंमलबजावणी व्यवस्थीत होण्यासाठी सुरु करण्यात आली. ही योजना जगातील एक अद्भूत घटना असून, भारतातील तीनही ऑईल कंपन्या म्हणजेच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, इंडियन ऑईल कार्पोरेशन यांनी 4 महिन्याच्या कमी कालावधीरत 80 टक्क्यांहूनही अधिक ग्रॅस ग्राहक या योजनेत सामील झाले आहेत. 30जून 2015 पर्यंत 12 कोटी 57 लाख आजतागायत 14 कोटी 10 लाख समाविष्ट झाले आहेत. आजअखेर साधारणत: 253 कोटींची बससिडी गॅस ग्राहकांच्या खात्यात जमा झाल्याचे सहायक व्यवस्थापक एम मोहन राव यांनी सांगितले.
     भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. ने. पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने या विशाल घरगुती गॅस अनुदान हस्तांतरणीय योजनेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश होण्यासाठी अर्ज केला आणि या अर्जाचे काटेकोर परीक्षणानंतर यु. एस. ए. चीन मधील सबसिडी हस्तांतर योजनेची तुलना करुन या पहल योजनेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले असेही  सहायक व्यवस्थापक एम मोहन राव यांनी सांगितले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.