शासन
योजना शेवटच्या
घटकापर्यंत पोहोचण्यासाठी
युवा
संघटकांनी मिशन
म्हणून काम
करावे
--
पालकमंत्री चंद्रकांत
पाटील
कोल्हापूर,
दि. 19
: केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी आणि विकास योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी युवा संघटकांनी एक मिशन म्हणून काम करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या नेहरु युवा कोल्हापूर केंद्रातर्फे शिवाजी विद्यापीठ येथे जिल्हा युवा संमेलनाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाथाजी पाटील, बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक एम. जी. कुलकर्णी, जिल्हा क्रिडा अधिकारी माणिकराव वाघमारे, भारतीय जीवन विमाचे प्रबंधक सुभाष चौगुले, युवा चळवळ चे व्याख्याते आनंद शिंदे, जिल्हा युवा समन्वयक हितेंद्र वैद्य, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे निवृत्त अधिकारी चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना या अल्प प्रिमियम भरुन, जीवनाची जोखीम देणाऱ्या तीन महत्वाकांक्षी विमा योजना जनतेला दिल्या असून या योजनेचे आतापर्यंत 14 कोटींहून अधिक सभासद झाले आहेत. रोजगारासाठी अनेक योजना आहेत. कामात प्रोफेशनपेक्षा मिशन आणले तर खूप गोष्टी करु शकू, असे सांगून ते म्हणाले, मुलींना केवळ जन्माला घालणे असे नाही तर मुलींना शिकवावे यासाठी बेटी बढाओ बेटी पढाओ योजनेमुळे मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी धोरण आहे. व्यक्तीगत गरजा भागल्यानंतर जो पैसा उरतो तो आपला नाही अशी मानसिकता निर्माण झाली पाहिजे, समाजामध्ये देण्याची वृत्ती, स्वावलंबी वृत्ती निर्माण झाली पाहिजे तरच समाजाची प्रगती होईल.
प्रारंभी स्वच्छ भारत, सुंदर भारत, व्यसनमुक्त भारत अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्राद्यापक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.