इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५

कमवा आणि शिका योजनेंतर्गत मुलींना काम देण्यासाठी विद्यापीठाने विशेष योजना आखावी -- पालकमंत्री चंद्रकांत पाटील


कमवा आणि शिका योजनेंतर्गत मुलींना
काम देण्यासाठी विद्यापीठाने विशेष योजना आखावी
-- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, दि. 19 : कमवा आणि शिका योजनेंतर्गत सहभागी मुलींना काम देण्यासाठी विद्यापीठाने विशेष निधी योजना निर्माण करावी या योजनेस उद्योजक अन्य घटकांकडून निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कमवा आणि शिका योजनेंतर्गत नियोजित मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, बीसीयुडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे, महेश काकडे, साव्रजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता उपळे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर प्राद्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या विद्यार्थींनींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक फीची व्यवस्था करण्याबाबत निश्चितपणे मदत केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यातील आर्थिक परिस्थिती गरीब असलेल्या अशा मुलींची माहिती संकलीत करावी. अशा मुलींच्या शैक्षणिक फीबाबत व्यवस्था करण्यास प्राधान्य राहील.
मुलींच्या वसतिगृहासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल. या वसतिगृहाची उभारणी अधिक दर्जेदार आणि गतिमान करण्याची सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलतांना केली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे याप्रसंगी म्हणाले, कमवा आणि शिका योजनेंतर्गत 100 मुलींचे वसतिगृह उभारण्यात येत असून हे काम लवकरात लवकर व्हावे, तसेच या वसतिगृहाशेजारीच 100 मुलींचे आणखी एक स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव असून या प्रस्तावास मान्यता मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी प्रभारी कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. या समारंभास प्राद्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.