यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार
माजी केंद्रीय मंत्री
खासदार शरद पवार यांना जाहीर
कोल्हापूर, दि. 20 : राजर्षी शाहू मेमोरीयल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने देण्यात येणार राजर्षी शाहू पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री खासदार शदर पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक 26 जून 2015 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी व राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी दिली.
राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, सचिव विवेक आगवणे, व्यवस्थापक कृष्णाजी हारुगडे, युवराज कदम उपस्थित होते.
राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये व मानपत्र असे आहे. 1984 पासून आजपर्यंत 30 जणांना प्रदान पुस्कार करण्यात आलेले आहेत. सामाजिक न्याय, समता, कृषी, औद्योगिक, क्रिडा, साहित्य व कला अशा अनेक विविध क्षेत्रातील राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणारे एक जेष्ठ व्यक्तीत्व म्हणून यावर्षीचा पुरस्कार खासदार शरद पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.