इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २६ जून, २०१६




शाहू जन्मस्थळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत
राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज यांच्या 142 व्या  जयंती निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
       यावेळी  कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, आमदार सतेज पाटील, महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळंुखे, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर शमा मुल्ला,  डॉ.जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती  मुरली जाधव, नगरसेवक अशोक जाधव, यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
दसरा चौकातही जयजयकार
       दरम्यान दसरा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळयाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी  कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी विद्यार्थ्यांची सवाद्य रॅली काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते रॅलीस झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात    झाली. या रॅलीमध्ये शाहू महाराजांची वेषभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झांज पथक, लेझीम पथक, शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्षवेधी चित्ररथासह शाहू महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.