इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २९ जून, २०१९

1 कोटी 13 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वनविभागाकडून 23 लाख 95 हजार खड्डे पूर्ण ----उपवनसंरक्षक



        कोल्हापूर, दि. 29 (जि.मा.का.) : राज्यातील  33 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 1 कोटी 13 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टापैकी वनविभागाकडून 23 लाख 95 हजार खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत अशी माहिती उपवनसंरक्षक एच. जी. धुमाळ यांनी दिली.
            सन 2019 च्या पावसाळ्यात राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने आखलेला आहे. यामध्ये जिल्ह्यास 1 कोटी 13 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाकडून संयुक्त वनव्यवस्थापन  समिती मार्फत किंवा निविदा राबवून ठेकेदामार्फत 23 लाख 95 हजार खड्डे खुदाईची कामे करण्यात आली आहेत.
            या कामांची छायाचित्रे आणि चित्रिकरण या विषयीची माहिती www.mahaforest.nic.in  या संकेतस्थळावर पहायला उपलब्ध आहे. सामाजिक वनीकरण व इतर शासकीय यंत्रणा यांना दिलेल्या उद्दिष्टांच्या  अनुषंगाने ऑनलाईन संकेतस्थळावर भरण्यात आलेली माहिती ही संबंधित यंत्रणेने भरलेली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार आढावा घेतला आहे. झालेल्या कामांचे छायाचित्रणदेखील अपलोड करण्यात आले आहे.
                        33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हा शासनाचा अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रम असून 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.