इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २४ जून, २०१९

सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग आवश्यक --- जिल्हाधिकारी दौलत देसाई


                                                                               




आंतरराष्ट्रीय योग दिन


कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का.) : शरीर आणि मन निरोगी, शुद्ध ठेवण्यासाठी हजारो वर्षापासून भारत देशाने दिलेली योग संस्कृती पुढे चालू ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करुया असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
         जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
          प्रशिक्षक नामदेव पाटील यांनी सुरुवातीला प्रात्यक्षिकं दाखवून उपस्थितांकडून विविध योगासने करवून घेतली. त्यानंतर प्रशिक्षक निलेश कागिनकर यांनी राष्ट्रीयस्तरावर सुवर्ण पदक प्राप्त, प्रज्ञा गायकवाड, माही घोरपडे, ओंकार दाभोळे, स्टीव्हन डिसूझा या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकं सादर केलीत. ‘योग जीवन’ अर्थात योगाभ्यासाने  हे डॉ. रणजित चिकोडे लिखित पुस्तके या विद्यार्थ्यांना भेट देवून जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी त्यांचा गौरव केला.
         हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने हे पुस्तक जगत आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, हजारो वर्षाच्या भारताच्या योग परंपरेला जागतिक स्तरावर आज मान्यता मिळाली आहे. योगामुळे मानसिक, शारीरिक आरोग्याला कोणताही धोका पोहचणार नाही. योगाभ्यासाला कोणत्याही वयाचं बंधन नाही. शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी योग परंपरा पुढे चालू ठेवा.
         याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, फादर जेन्स थोरात आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कसा पहाल Q R कोड
क्यु आर कोड स्कॅनर प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करा. वरील क्यु आर कोड स्कॅन करा, मोबाईलवर दिसणारी लिंक क्लिक केल्यास सोबतच्या वृत्ताची क्लीप आपल्याला पाहता येईल.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.