इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २४ जून, २०१९

मयत ग्रामसेवक संदिप तेली यांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते 15 लाखाचा धनादेश




कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कर्तव्यावर असताना अपघातात मयत झालेल्या ग्रामसेवक संदिप तेली यांच्या पत्नी श्रीमती मेघा तेली यांना महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज 15 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
          शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील ग्रामसेवक संदिप सातलिंगा तेली हे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या कामकाजासाठी वडणगे व पाडळी बु. येथे कार्यरत होते. 18 एप्रिल 2019 रोजी रात्री 11.15 वाजता मोटरसायकलवरुन कोल्हापूरकडे येत असताना शिवाजी पुलावर त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
          सानुग्रह अनुदान म्हणून 15 लाख रुपयांचा धनादेश त्यांची वारस श्रीमती मेघा संदिप तेली यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव आदी उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.