इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २९ जुलै, २०२१

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळमार्फत थेट कर्ज योजना, 20 टक्के बिजभांडवल योजना आणि व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. ऑफलान योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज मिळण्यासाठी संबधितांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. ऑनलान योजनेअंतर्गत www.msobcfdc.org या संकेतस्थळावर व्याज परतावा योजना हा पर्याय निवडून अर्ज, संबधित कागदपत्रे पोर्टलवरुन सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे.   

2021-22 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेत संपूर्ण कर्ज महामंडळाचे राहील. 20 टक्के बीज भांडवल योजनेत 75 टक्के कर्ज बँकेचे, 20 टक्के कर्ज महामंडळाचे  व 5 टक्के लाभार्थी सहभाग राहील. व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहील. लाभार्थीने कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल 12 टक्क्यापर्यंत व्याज महामंडळ लाभार्थीच्या बैंक खात्यावर जमा करेल. थेट कर्ज योजना आणि 20 टक्के बिजभांडवल योजना ऑफलान असून व्याज परतावा योजना ऑनलाइन स्वरुपाची आहे.

अधिक माहितीसाठी महामंडळाचे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब अंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, ताराराणी चौक, कोल्हापूर फोन क्र. 0231-2653512 येथे संपर्क साधावा.

000000

 

                    

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.