सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

निवृत्तीवेतनधारकांसाठी 23 मार्चला पेंशन अदालत

 

 

        कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्याव्दारे दिनांक 23 मार्च रोजी दुपारी 3 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, मुंबई येथे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 50 वी पेंशन अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

           निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे, टपाल विभाग महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तीधारक ज्यांचे 3 महिन्याच्या आत निपटारा झालेला नाही, अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतमध्ये विचार केला जाईल.

          पेंशन अदालतध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीबीओपी/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी.च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी प्रपत्रामध्ये अर्जाच्या तिप्पट प्रति लेखा अधिकारी/ सचिव पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई येथे दि. 23 फेब्रुवारीपर्यंत किंवा यापूर्वी पाठवू शकता. त्यानंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतीमध्ये विचार करण्यात येणार नाही.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.