मंगळवार, ५ जुलै, २०१६

                                             

                                         
 मुद्रा योजनेद्वारे जिल्ह्यात
213 कोटीवर अर्थसहाय्य
                                          -जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी
जिल्ह्यात मुद्रा योजनेचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याचे निर्देश
                कोल्हापूर दि. : जिल्ह्‌यात मुद्रा योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यात 23 हजार 271 लाभार्थ्यांना 213 कोटी 48 लाखांचे अर्थसहाय्य विविध बँकाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. मुद्रा योजनाही होतकरु, बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणारी महत्वपूर्ण योजना असल्याने जिल्ह्यात तीचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी यावेळी दिले.
                मुद्रा बँक जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हा अग्रणी व्यवस्थापक एम.जी.कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी एस.आर.माने, जिल्हा उद्योग केंद्राच्या मंजुषा चव्हाण, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे अधिकारी राजेंद्र कामत, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे  प्रतिनिधी एस.एस.शेळके यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
                जिल्ह्यातील होतकरु तरुणांना मुद्रा योजनेद्वारे अर्थ सहाय्य देण्यास बँकांनी सक्रीय व्हावे, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले,जिल्ह्यात मुद्रा योजना सन 2015 पासून राबविली जात असून आतापर्यंत 23 हजार 271 खातेदारांना 213 कोटी 48 लाखांचे अर्थसहाय विविध बँकाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये शिशू योजनेंतर्गत 19 हजार 820 तरुणांना 66 कोटी 14 लाख, किशोर योजनेंर्गत 2 हजार 751 तरुणांना 95 कोटी 97 लाख आणि तरुण योजनेंतर्गत 700 तरुणांना 51 कोटी 36 लाखाचे अर्थ सहाय्य करण्यात आले आहे. यापुढील काळातही मुद्रा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुण लघु उद्योजकांना अधिकाधिक अर्थ सहाय्य करुन ही योजना अधिक प्रभावी राबविली जाईल असेही ते म्हणाले.
                मुद्रा योजनेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांची जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपब्ध करुन देण्यावर शासनाचा भर आहे.  या योजनेंतर्गत तीन गटामध्ये कर्ज उपलब्ध करु दिले जात असून शिशू गटासाठी 10 हजार ते 50 हजार, किशोर गटासाठी 50 हजार ते 5 लाख आणि तरुण गटासाठी 5 लाख ते 10 लाख असे कर्ज जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीय, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्थामार्फत उपलब्ध करुन दिले जात आहे.
                मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांनाही कर्ज उपलब्ध होऊ शकते त्याच बरोबरच सुतार, गवंडी काम, कुंभार, सलुन, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते इत्यादी लहान स्वरुपाच्या व्यवसायासाठीही कर्ज देण्याची तरतुद केली आहेे. या योजनेद्वारे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजग निर्माण व्हावे या हेतूने मा. पंतप्रधांच्या संकल्पनेतून मुद्रा योजना राबविली जात आहे. या योजनेचे प्रभावी आणि परिणामकारक जागृती करुन ही योजना अधिक गतीमान आणि प्रभावीपणे राबविण्याची सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी  यांनी दिली.
                यावेळी मुद्रा योजनेच्या प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी बाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
 00 0 0 0 0 0

                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.