दिव्यांगांच्या विकासासाठी
चांगल्या कल्पनांना प्रोत्साहन देऊ
-जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी
कोल्हापूर, दि.
7 : जिल्ह्यात दिव्यांगांची संख्या किती आहे कोणत्या प्रकारचे दिव्यांग आहेत, याचा सर्व्हे होणे आवश्यक आहे, तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी दिव्यांगांच्या विकासासाठी एकत्र येऊन नवीन संकल्पना मांडाव्यात, त्यांना निश्चितपणे प्रोत्साहन देऊ व कोल्हापूर जिल्हा याही बाबतीत आदर्श मॉडेल म्हणून उभे करु, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
हँन्डकॅप बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हॅन्डीकॅप प्रशिक्षण व रोजगार उद्योग केंद्र, कोल्हापूर व जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील पहिल बॅच (इनव्हलप मेकिंग कोर्स) प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, हॅन्डीकॅप बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा कौशल्य विकास व स्वयंरोजगारचे राजेंद्र कामत, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अरुण वाडेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुंदरसिंग वसावे, संस्थेचे सचिव रुबन लोखंडे, शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य विकास विभागाचे ए.एम. गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिव्यागांना कौशल्य विकसित करुन रोजगारक्षम बनविण्याच्या उपक्रमाबद्दल हॅन्डकॅप बहुउद्देशीय संस्थेचे अभिनंदन केले. तसेच ज्या मातांनी आपल्या पाल्यांना या ट्रेनिंग मध्ये प्रवेश घेतला व हे ट्रेनिंग पूर्ण केले, ज्या प्रशिक्षकांनी संयमाने या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत असणाऱ्या ज्या मोबाईल शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या पालकांची भुमिका पार पाडली अशा सर्वांना डॉ. अमित सैनी यांनी धन्यवाद दिले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजार पेठ असली पाहिजे, असून सांगून या विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीवर थांबू नये तर त्यांनी स्वंयरोजगारी बनून रोजगार निर्मिते व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी योवेळी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांना मुद्रा योजनेचाही मोठ्या प्रमाणात लाभ द्यावा, असे सांगून जिल्ह्यात दिव्यांगाचा सर्व्हे व्हावा त्यांची संख्या व प्रकार शोधून या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी त्यांच्या हक्कांची मागणी करत असतानाच नवीन संकल्पना मांडाव्यात त्यातून काही ठोस उपक्रम राबविता येतील. चांगल्या संकल्पना मांडाव्यात, त्यांना प्रोत्साहन दिले जाईल व कोल्हापूर दिव्यागांच्या विकासात आदर्श मॉडेल म्हणून उभे करता येईल, असे डॉ. अमित सैनी म्हणाले.
डॉ.
कुणाल खेमणार म्हणाले, जिल्हा परिषद ही विकासाची गंगा असून विविध येाजना राबवित असतांना दिव्यागांचा प्राधान्याने विचार केला जाईल.
राजीव आवळे म्हणाले, दिव्यागांना सक्ष्म करण्याचे काम गेली सात वर्षे संस्थेमार्फत होत असून पालकांनी दिव्यांग पाल्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांच्या कौशल्य विकास घडवून आणावा. महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत ही संस्था दिव्यांगासाठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबविले याच धर्तीवर जिल्हा परिषदेनेही जिल्ह्यात या उपक्रमासाठी जागा मिळवून द्यावी.
यावेळी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत एन्व्हलप मेकिंग कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या बॅचला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मिरजक तिकटी येथील ज्ञान प्रबोधनी अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय भावस्पर्शी स्वागत गीत गाईले.
ए.एम.गुरव यांनी कौशल्य आणि उद्योजकता विकास यावर मार्गदर्शन केले. रुबेन लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. दत्ताराम शेटके यांनी मुकबधिरांच्या सांकेतिक भाषेत सर्व कार्यक्रमाचे भाषांतर केले.
0 0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.