कोल्हापूर,दि. 15 (जिल्हा माहिती
कार्यालय) : डाक विभागामार्फत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय स्तरावर सन
२०२० साठी छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत कोणत्याही
वयोगटातील भारताचा नागरिक भाग घेवू शकतो. प्रवेशिका https://www.mhgov.in/task/design-stamp-themed-unesco-world/heritage-sites-india-cultural
येथे अपलोड करावी. दि. 27 जुलै 2020 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असल्याचे कोल्हापूर डाक विभागाच्या
प्रवर अधीक्षकांनी कळविले आहे.
स्पर्धेचा विषय “युनेस्कोच्या जागतिक वारसा
स्थळ (सांस्कृतिक) / “UNESCO World Heritage Sites in India (Cultural)” हा आहे. फोटो स्वत: सहभागी स्पर्धकाने काढलेला असावा आणि तो आधी
कोणत्याही प्रिंट किंवा डिजिटल माध्यमामध्ये प्रकाशित केलेला नसावा. प्रवेशिका अशा प्रकारे
असावी की त्यांचे छायाचित्रण आकर्षक दृष्ट्या आकर्षक पद्धतीने दर्शविले जावे, जेणेकरून
फिलेटेलिक संग्राहकांना आवडेल.
नाव, वय, लिंग, नागरिकत्व, पिन कोडसह संपूर्ण निवासी
पत्ता, फोन / मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी (असल्यास), फोटोमध्ये दर्शविलेल्या प्रतिमेची तारीख आणि तपशील, उपकरणांचा तपशिल
ज्याद्वारे फोटो घेतला होता उदा.
कॅमेरा मॉडेल इत्यादी तपशील आवश्यक आहे.
प्रवेशिकेसह
प्रविष्ट केलेले छायाचित्र मूळ आहे आणि कोणतेही कॉपीराइट समस्या समाविष्ट नाहीत असे
प्रमाणपत्र आवश्यक आहे. कॉपीराइट समस्येशी संबंधित कोणत्याही कायदेशीर विवाद
प्रकरणात, पोस्ट विभाग जबाबदार राहणार नाही.
बक्षिस जिंकणारे छायाचित्र
स्टॅम्प आणि इतर फिलेटेलिसामग्री वापरण्यासाठी गनली जातील. प्रथम क्रमांकाचे
बक्षीस 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाचे
बक्षीस १० हजार रुपये व पाच प्रोत्साहनपर बक्षिसे प्रत्येकी ५ हजार रुपये असे
बक्षीसाचे स्वरुप आहे.
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.