गुरुवार, १६ जुलै, २०२०

पालकमंत्री सतेज पाटील यांची कोरोनाबाबत उद्या लोकप्रतिनिधींशी व्हीसीव्दारे बैठक




कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): पालकमंत्री सतेज पाटील हे उद्या सकाळी 10 वाजता कोरोनाच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे बैठक घेणार आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या त्याचबरोबर मृत्यू त्याअनुषंगाने उपचार पध्दती, रूग्णालयांची व्यवस्था, आरोग्य साधनसामुग्रींचे नियोजन, प्लाझ्मा थेरेपी एकूणच जिल्ह्याची सद्यस्थिती याबाबत जिल्ह्यातील खासदार, आमदार या सर्वांची उद्या शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे संवाद साधून बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही सहभागी होण्याची विनंती करण्यात येणार आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.