बुधवार, १५ जुलै, २०२०

बेरोजगार युवकांनी स्वत:चा रोजगार निर्माण करावा - संजय पवार




       कोल्हापूर,दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : बेरोजगार युवकांनी शासकीय खासगी नोकरीच्या मागे धावता स्वत:चा रोजगार निर्माण करुन त्या रोजगारामधून इतरांना रोजगार द्यावा. स्वयंरोजगारामधून स्वत:ची समाजाची प्रगती करावी, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.
          जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने आज ऑनलाईन उद्योजकीय व्यक्तिमत्व विकासांबाबत बेरोजगार युवकांना मार्गदर्शन केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे बेरोजगार युवकांना कमी भांडवलामध्ये वेगवेगळे उद्योग,स्वयंरोजगार कसा करता येईल याबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
          ऑनलाईन मार्गदर्शन सत्रासाठी जवळपास 32 बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला. स्वयंरोजगारामधून करिअर कसा घडवावे याबाबत उद्भवणारे प्रश्नाचे निवारण  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. पवार व  निमस, नोएडा मधील एनआयईएसबीयूडीचे एचआर संदिप पवार यांनी केले.
           मार्गदर्शन सत्रास सहायक आयुक्त ज.बा.करीम कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.मु.पवार उपस्थित होते. सहायक आयुक्त श्री. करीम यांनी आभार मानले.
 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.