शनिवार, १८ जुलै, २०२०

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा कोल्हापूर दौरा



            कोल्हापूर,दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे रविवार 19 जुलै 2020 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
       रविवार दि. 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठ येथे आगमन व महाराष्ट्र-कर्नाटक सिमावर्ती भागातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक उपक्रम राबविण्यासंदर्भात बैठक. (स्थळ : मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ).
दुपारी 12.25 ते 2.00 वाजेपर्यंत मुख्यमंत्री  महोदयांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा,      2 ते 2.30 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 2.30 ते 3.30 वाजेपर्यंत शिवाजी विद्यापीठ येथे आढावा बैठक. 3.30 वाजता शिक्षक संघ शिष्टमंडळासमवेत चर्चा, (स्थळ : मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ). 3.45 वाजता अभ्यागत व शिष्टमंडळाच्या भेटीसाठी राखीव. 4 वाजता पत्रकार परिषद (स्थळ : शिवाजी विद्यापीठ). 5.30 वा. बाबासो दिनकर पाटील यांची सांत्वनपर भेट (स्थळ : वाशी, ता. करवीर). सायं 5.45 वाजता. मोटारीने मुंबईकडे प्रयाण.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.