कोल्हापूर, दि. 20 (जिमाका):
जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी)
परीक्षा केंद्रे असून परिक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी प्र.अपर
जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्ह्यात ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक व
माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार आहेत अशा परीक्षा
केंद्रांच्या/उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात दि.21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत
(ज्या दिवशी परीक्षा पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 9 वाजल्यापासून ते
सायं. 18.30 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये मोबाईल फोन व त्या
संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व
लॅपटॉप यांचा वापर करण्यास बंदी घातली आहे.
या आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. बंदी आदेश परीक्षेचे कामकाजासाठी
नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना, त्यांना नेमून दिलेल्या परिक्षेच्या
कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू नसतील.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.