इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

सेवा रुग्णालय येथे श्रवणदोष तपासणी सेवा उपलब्ध

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे कार्यान्वित झाला आहे.

यासाठी डॉ. जयंत वाटवे, डॉ. दिलिप वाडकर (कान, नाक, घसा तज्ञ) ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक असिस्टंट व हिअरिंग इन्स्ट्रक्टर आदी मनुष्यबळ उपलब्ध झाले आहेत. तसेच श्रवणदोष तपासणीच्या ऑडिओमीटर, इम्पेडिन्स ऑडिओमीटर, ओ.ए.ई., बेरा (नवजात शिशुंची श्रवण तपासणी यंत्र) आदी अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध झालेल्या आहेत. वरील सुविधा राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत उपलब्ध आहेत. तरी याचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा, असे आवाहन सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.