इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १३ जुलै, २०२२

सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधा -सहायक आयुक्त संजय माळी

 


कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

            जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्या महास्वंयम पोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ज्या उमेदवारांनी एम्लॉयमेंट कार्डला आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी एम्लॉयमेंट कार्डमध्ये आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर याची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे.

            माहिती अद्यावत करण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील रोजगार (Employment) हा पर्याय निवडून नोकरी साधक (Job Seeker) हा पर्याय निवडून युजर आयडी पासवर्ड वापरुन Login व्हावे आधार नंबर या ठिकाणी आधार नंबर नमूद करुन कॅप्च्या (Captcha) टाकून सबमिट (Submit) या बटनावर क्लिक करावे, जेणेकरून माहिती अद्यावत होईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.