शुक्रवार, ८ जुलै, २०२२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह पांचगाव येथे मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

 


 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, पाचगांव, कोल्हापूर येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये इ. 8 वी पासून पुढे विद्यालयीन, महाविद्यालयीन व व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणा-या विद्यार्थी (अनुसूचित जाती/अनसुचित जमाती / विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या मागास विशेष मागास प्रवर्ग/अपंग/अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कार्यालयीन वेळेत मोफत प्रवेश अर्ज वाटप सुरू आहे, अशी माहिती वसतिगृहाचे अधीक्षक विवेक चेचर यांनी दिली.

प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य, जेवण, राहण्याची सोय असून सुसज्ज ग्रंथालय, सभागृह संगणक कक्ष, मनोरंजन कक्ष, जिम व विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, गणवेश भत्ता, सहलभत्ता, स्टेशनरी भत्ता इत्यादी सोयीसुविधा देण्यात येतात.

            प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, पाचगांव येथे अधीक्षक शंकर चेचर, भ्रमणध्वनी -९०४९२१२००४ दूरध्वनी क्र.  ०२३१-२६३८७७९ व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा.  

 

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.