इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १२ जुलै, २०२२

15 ते 18 जुलै या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 



कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जागतिक युवा कौशल्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त खासगी आस्थापनांच्या रिक्त पदांसाठी दिनांक 15 ते 18 जुलै या कालावधीत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्या’चे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.

          हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपला युझर आयडी व पासवर्डच्या आधारे जिल्हा कौशल्य विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.

             इच्छुक युवक- युवतींनी दि. 18 जुलै पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दूरध्वनी क्रमांकावर 0231-2545677 संपर्क साधावा.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.