इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज सादर करण्यास 31 जुलै अखेर मुदतवाढ

 

 

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना राज्य शासनाच्या वतीने महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र ज्यांनी अद्याप आपले अर्ज पोर्टलवर सादर केलेले नाहीत. अशा दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नव्याने अर्ज सादर करण्यासाठी दि. 31 जुलै अखेर मुदतवाढ देण्यात आली असून जास्तीत- जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

ज्या महाविद्यालयातून दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या स्तरावरुन अवगत करुन याबाबत जनजागृती करण्यात यावी. तसेच या शिष्यवृत्ती योजनेपासून दिव्यांग विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी, असेही श्री. घाटे यांनी कळविले आहे.

000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.