इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धनाची काळजी घ्यायला हवी -- अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज

कोल्हापूर दि. १ : वृक्ष लागवड करणे सध्याची गरज आहे. वृक्ष लागवड करण्याबरोबरच त्यांचे संवर्धन होईल याचीही काळजी घ्यायला हवी, असे मत अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांनी आज व्यक्त केले.
कोषागार दिनानिमित्त आज महाराष्ट्र हायस्कूलच्या परिसरात कोल्हापूर कोषागार कार्यालयामार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोषागार अधिकारी अजित चौगुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य पी. के. पाटील उपस्थित होते.
श्री. धुळाज म्हणाले, सध्या पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा अतिशय महत्वाचा झाला आहे. त्यासाठी वृक्षारोपण तर करायलाच हवे पण वृक्षांचे संवर्धन कसे होईल याकडे लक्ष द्यायला हवे. कारण वृक्षच पर्यावरणाचे खरे संरक्षक आहेत.
यावेळी सहाय्यक कोषागार अधिकारी दीपक काळगे, वैभव राऊत, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संस्थेचे उपाध्यक्ष अमृतराव भोसले, सचिव आर. डी. आतकिरे, प्रा. सी. एम. गायकवाड आदी उपस्थित होते.
कोषागार दिनानिमित्त आज कथाकथन, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि अंताक्षरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी माजी प्राचार्य एन. डी. खिचडी यांचे व्याख्यान झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.