इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

बेरोजगार व उद्योजकांनी महा-ई-सेवा केंद्गांचा लाभ घ्यावा

        कोल्हापूर दि. ९ : शासनाने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गामार्फत दिल्या जाणार्‍या सेवा बेरोजगार व उद्योजकांना अधिक तत्पर आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने रोजगार विषयक सेवांचे विकेंद्गीकरण करुन शासन निर्णय निर्गमित केला आहे.
      इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी, शैक्षणिक पात्रता, अनुभव, संपर्क व पत्ता बदलणे, नोंदणीचे नुतनीकरण, दुय्यम ओळखपत्र देणे, संपर्क व पत्ता बदलून ओळखपत्र देण्याबरोबरच उद्योजकांकरिता नवीन आस्थापनेची नोंदणी करणे, ईआर-१ व ईआर-२ विवरणपत्रे सादर करणे या सेवा ३ जानेवारी २०१२ पासून अधिकृत महा-ई-सेवा केंद्गे, शासकीय आय. टी. आय., पॉलिटेक्नीक, इंजिनिअरिंग कॉलेजेस आदीमधून ऑनलाईन पध्दतीने सशुल्क उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
      कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागांसाठी स्पॅन्को लि. कंपनीच्या १२१ महा-ई-सेवा केंद्गामधून तसेच शासनाच्या जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमधूनही सशुल्क नोंदणी सेवा उपलब्ध आहेत.
      नवीन सुरु केलेल्या रोजगार विषयक सशुल्क सेवांचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगार व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूरचे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक गं. अ. सांगडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.