इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

एक मार्चपासून शंभर टक्के घरपोच गॅस सेवा पुरविणार - जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे

      कोल्हापूर दि. १५ : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गॅस ग्राहकांना मार्च २०१२ पासून शंभर टक्के घरपोच गॅस सिलेंडर सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी आज दिली.
      श्री. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कोणत्याही ग्राहकाने गॅस एजन्सीमध्ये जाऊन सिलेंडर देण्याबाबत आग्रह धरु नये. रेशनकार्ड नसणार्‍या गॅसधारकांस १ मार्च २०१२ पासून सिलेंडर वितरित करता येणार नाही. एकाच कुटुंबातील सदस्य विभक्त राहत असल्यास त्याचा खात्रीलायक पुरावा सादर केल्यास सदर अर्जदारास फक्त गॅससाठी शुभ्र शिधापत्रिका देण्यात येणार आहे.
      कंपनीकडून पूर्वी ५ किलो वजनाची लहान सिलेंडर वितरित केलेली आहेत. ही सिलेंडर्स ग्राहकांनी ज्या त्या एजन्सीकडे परत करावयाची आहेत. ज्यामुळे वाहनांमध्ये अनाधिकृत गॅस किट तयार करण्यावर निर्बंध येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.