इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

खत विक्रेत्यांनी रासायनिक खत पुरवठ्यासाठी एमएफएमएस नोंदणी १४ फेब्रुवारीपर्यंत करावी

        कोल्हापूर दि. ३ : कोल्हापूर जिल्ह्यात एमएफएमएस (मोबाईल फर्टिलायझर मॉनिटरींग सिस्टीम) केंद्ग शासनाच्या निर्देशानुसार सुरु झाली आहे. यापुढे कृषि सेवा केंद्गांना रासायनिक खत पुरवठा हा रासायनिक खत सनियंत्रण प्रणाली (एमएफएमएस) द्वारेच केला जाणार आहे.
        कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना सप्टेंबर व नोव्हेंबर २०११ मध्ये प्रशिक्षण देण्यात आले असून एमएफएमएस नोंदणीबाबत सुचित करण्यात आले होते. तसेच १४ जानेवारी २०१२ अखेर वाढीव मुदत देवूनही जिल्ह्यातील १८८५ रासयानिक खत विक्रेत्यांपैकी केवळ १२४४ विक्रेत्यांनीच नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विक्रेत्यांनाच भविष्यात खत पुरवठा होणार असल्याची जाणीव करुन देखील कांही विक्रेत्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तसेच कांही विक्रेत्यांनी केवळ सुक्षम मुलद्गव्य व पाण्यात विद्गाव्य खतांची विक्री करणार या सबबीखाली नोंदणी केलेली नाही असे निदर्शनास आले आहे. मात्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व परवानाधारक खत विक्रेत्यांनी नोंदणी करणे सक्तीचे केले आहे.
      शासनामार्फत १४ फेब्रुवारी २०१२ पर्यंत पुनःश्च मोबाईल एमएफएमएस नोंदणीकरिता अंतिम मुदतवाढ दिलेली असून सर्व विक्रेत्यांनी नोंदणी पूर्ण करावी. अन्यथा ज्या विक्रेत्यांनी नोंदणी केलेली नाही अशा सर्व विक्रेत्यांना कृषि विकास अधिकारी कार्यालय स्तरावरुन परवाने रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. ज्या विक्रेत्यांनी नोंदणीसाठी अपुरी माहिती सादर केल्याने माहिती स्विकृत होऊ शकली नाही अशांनी तात्काळ माहितीसह संबंधित तालुक्यांना नेमून दिलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीकडे संपर्क साधून एमएफएमएस नोंदणी पूर्ण करावी. तसेच इतर विक्रेत्यांनीही माहिती स्विकृत झाली किंवा नाही याची शहानिशा करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुरेश मगदूम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
एमएफएमएस नोंदणी स्विकृत झालेल्या विक्रेत्यांना केंद्ग शासनामार्फत त्यांच्या मोबाईलवर रासायनिक खत विक्री व्यवहाराच्या सोयीसाठी सांकेतीक नंबर देण्यात येत असून याचीही खातर जमा संबंधितांनी करावी असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.