गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

अन्न पदार्थांची विक्री करणार्यां नी परवाना घेणे आवश्यक

          कोल्हापूर दि. ९ : कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कॅटरर्स, देशी-विदेशी दारु विक्रेते, बिअर शॉपी चालक, कंपन्यांच्या उद्योग समुहांच्या खानपान सेवा पुरविणारे कॅटरींग ठेकेदार किंवा कॅन्टीन, महाविद्यालये, विद्यापीठांचे कॅन्टीन्स चालक, शासकीय व निमशासकीय विद्यार्थी वसतिगृहासाठी खानपान सेवा पुरविणारे कॅन्टीन्स चालक, इस्पितळांतून रुग्णांसाठी व अन्य व्यक्तींना अन्न सेवा पुरविणारे कॅन्टीन्स चालक, शासकीय शालेय पोषण आहार सेवा पुरविणारे ठेकेदार आणि अन्न घटक पुरवठादार, विविध बचत गट, सर्व शासकीय कार्यालयासाठी खानपान सेवा पुरविणारे कॅन्टीन्स चालक उदा. कोर्ट कॅन्टीन्स आदी यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमावली २०११ नुसार परवाना घेणे आवश्यक आहे.
      संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करुन विहित कागदपत्रासह शुल्क भरुन परवाना घेणे आवश्यक आहे. जो कोणी विक्रेता विना परवाना अन्न पदार्थांची विक्री करत असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार न्यायालयीन कारवाई व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
      तरी संबंधितांनी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, ८५२/८, रघुकुल, बी वॉर्ड, सुभाष रोड, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधून परवान्यासाठी / नोंदणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन कोल्हापूरचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना अधिकारी व पदावधित अधिकारी स. बा. जानकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.