इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

सबला योजनेंतर्गंत किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण इच्छुकांनी अर्ज पाठवावेत

        कोल्हापूर दि. ८ : कोल्हापूर जिल्ह्यातील १६ प्रकल्पात केंद्ग पुरस्कृत सबला योजनेंतर्गंत किशोरवयीन मुलींना आहार, आरोग्य व जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, होम सायन्स कॉलेज, आहार व आरोग्य तज्ञ, समाज कार्य महाविद्यालय, युनिसेफ प्रशिक्षण व इतर इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
        अर्जदार संस्थेकडे किमान चार महिला प्रशिक्षक असावेत व त्यांनी किमान २० अंगणवाड्यांचे क्षेत्र पहावे. शासनाने ठरविलेल्या दीपशिखा प्रशिक्षण कार्यक्रमाचा वापर करणे बंधनकारक राहील. दहा दिवसांच्या व ४० मुलींच्या निवासी प्रशिक्षण सत्रासाठी ऐंशी हजार रुपये एवढा ठराविक खर्च देण्यात येईल.
        अर्जदारांनी विहित नमुन्यात उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याकडे १० दिवसांच्या आत अर्ज करावा. १६ प्रकल्पाचा तपशील, प्रशिक्षणाची सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना आदी माहिती http://www.icds.gov.in/ या वेबसाईटवर तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) जिल्हा परिषद, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक ०२३१/२६६८११५, २६५७१९० आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत, असे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.