इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १६ जून, २०१२

औषधाच्या खरेदीसाठी 10 लाखास जिल्हा नियोजन समितीकडून मंजूरी


 कोल्हापूर दि. 15 : इचलकरंजीतील काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक औषधांच्या खरेदीसाठी दहा लाख रुपयांस जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे.
सहकार संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इचलकंरजी दौर्‍यात औषधांच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतुन दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी औषधांच्या खरेदीसाठीचे कार्यादेश दिले आहेत. औषधांसाठी एकूण 13 लाख रुपयांची औषधखरेदीचे कार्यादेश शल्य चिकित्सिकांनी दिले आहेत, असे जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे . जगदाळे यानी सांगितले
      त्याचबरोबर इचलकंरजीतील इंदिरा गांधी मेमोरिअल रुग्णालयास आवश्यक असणारी अ‍ॅटो अ‍ॅनालयझर यंत्र खरेदी करण्यसाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपल्या निधीतून साडे आठ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे, असेही श्री. जगदाळे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.