इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १८ जून, २०१२

पीएचडी करणार्याु विद्यार्थ्यास साडे सहा हजार विद्यावेतन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांची माहिती

       कोल्हापूर दि. 18 : राज्यातील विद्यापीठात पी. एच. डी. करणार्‍या विद्यार्थ्यांस साडेसहा हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याचा राज्य शासन विचार करीत आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
      शिवाजी विद्यापीठ आणि झी 24 तास वृत्तवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण परिषदेत ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार चंद्गकांत पाटील, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, डॉ. अर्जुन राजगे उपस्थित होते.
      श्री. टोपे म्हणाले, 'शिक्षण क्षेत्रात विस्तारीकरण, सर्वसमावेशक आणि गुणवत्ता या तीन मुद्यावर प्रामुख्याने विचार केला जात आहे. विस्तारीकरण या मुद्यावर आपण प्रगती केली आहे. पण सर्वसमावेशक आणि गुणवत्ता या दोन बाबीवर विचार केला पाहिजे. आपल्या राज्याचा ग्रोस एनरोलमेंट रेशो 18 टक्के आहे. तो वाढायला हवा. असा रेशो वाढल्यास त्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करायला हव्यात. शिक्षणातील गुणवत्ता उंचावण्याचे मोठे आव्हान आहे. कारण उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षकांची कमतरता भासत आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा चांगल्या शिक्षकांशिवाय उंचावणे शक्यच नाही. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ येण्यासाठी पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी दरमहा साडेसहा हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याचा राज्य शासन विचार करीत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनात घेण्यात येईल'.
      राज्य शासन मागासवर्गीय, इतर मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क आणि शिष्यवृत्ती इत्यादीच्या माध्यमातून सुमारे दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च करीत आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात राज्य देशात आघाडीवर आहे, असे सांगून श्री. टोपे म्हणाले, विद्यापीठांनी समाजकेंद्गी शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. उद्योग, समाज यांना ाकेणत्या प्रकारचे मनुष्यबळ अपेक्षीत आहे त्याचा विचार करुन अभ्यासक्रमतयार करायला हवेत. त्याबरोबर गुणवत्ता वाढविण्यासाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय होण्याचीही आवश्यकता आहे.
      कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांनी राज्य शासन उच्च शिक्षणात करीत असलेले बदल स्वागतार्ह आहेत. त्याची अमंलबजावणी योग्य रीतीने होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. झी-24 तास वाहिनीचे संपादक उदय निरगुडंकर यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.