इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १९ जून, २०१२

राजर्षी शाहू व्याख्यानमालेस आजपासून सुरुवात


कोल्हापूर दि. 18 : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेस उद्यापासून 19 जून 2012 प्रारंभ होत आहे. या व्याख्यानमालेत विविध विषयातील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्यात आली असून सर्व व्याख्याने दररोज सायं. 6 वा. होणार आहेत.
मंगळवार दि. 19 जून 2012 रोजी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचे धसामान्यांना रोखणारे आजचे उच्चशिक्षणध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.  बुधवार दि. 20 जून 2012 रोजी माजी जिल्हाधिकारी व खासदार श्रीनिवास पाटील यांचे धआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : यशंवतराव चव्हाणध  या विषयावर व्याख्यान होणार आहे.
गुरुवार दि. 21 जून 2012 रोजी ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक बाबा भांड यांचे धमहाराष्ट्राचे लोकोत्तर राजे : सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहूध या विषयावर व्याख्यान होणार आहे.शुक्रवार दि. 22 जून 2012 रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांचे धएकविसाव्या शतकातील स्त्रियांचे प्रश्नध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि. 23 जून रोजी ज्येष्ठ संपादक व व साहित्यिक भानू काळे यांचे धबदलत्या भारताचा सामाजिक चेहराध या  विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार दि. 24 जून रोजी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ अरुण देशपांडे यांचे धऊर्जा, पाणी आणि पर्यावरणध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि. 25 जून रोजी निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे धशेजारील राष्ट्रे व भारताची संरक्षण सिध्दताध या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवार दि. 26 जून रोजी  सकाळी 8 वा. राजर्षी शाहू जन्मस्थळ, कसबा बावडा, कोल्हापूर येथे राजर्षी शाहू प्रतिमेचे पूजन, 9 वा. राजर्षी शाहू पुतळा, दसरा चौक येथे राजर्षी शाहू अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वा. राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दसरा चौक येथे राजर्षी शाहू पुरस्काराचे वितरण मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्येकर्ते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास व व्याख्यानमालेस जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी व राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब धुळाज यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.