इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

सीपीआर, आयजीएम आणि एस. डी. एच गडहिंग्लजसाठी स्वतंत्र समिती नियुक्त आग प्रतिबंधात्मक व विद्युत पुरवठा यंत्रणेचे होणार ऑडीट जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय):  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी आणि उप जिल्हा रुग्णालय गडहिंग्लज रुग्णालयातील आग प्रतिबंधात्मक व विद्युत पुरवठा यंत्रणेचे ऑडीट करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन समित्या नियुक्त केल्या आहेत.

       छत्रपती प्रमिलाराजे र्वोपचार रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. चौगुले, महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी रणजित चिले, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे डॉ. उल्हास मिसाळ तर सदस्य सचिव म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. हजारे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. चौगुले, इचलकरंजी नगरपालिका विभागाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र मिरगे तर सदस्य सचिव म्हणून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रविकुमार शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुधाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून गडहिंग्लजमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मांजरेकर, कोल्हापूरमधील सार्वजनिक बांधकामाच्या विद्युत उपविभागाचे उपअभियंता सी. बी. चाकोते, गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशम दलाचे रविनंदन जाधव तर सदस्य सचिव म्हणून गडहिंगलज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक आंबोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गठित समितीस रुग्णालयामधील आगसंरक्षक यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही करणे, रुग्णालयातील आगसंरक्षक यंत्रणा सुस्थितीत असल्याचे ऑडीट करणे, रुग्णांलयातील इलेक्ट्रिकल फिटिंग सुस्थितीत असल्याचे ऑडीट करणे, ऑडीट मध्ये ज्या त्रुटी आढळल्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक नियमावली निश्चित करणे व उपाय योजना सूचविणे, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णालयास सूचना देणे आणि आवश्यकतेप्रमाणे खासगी यंत्रणेकडून सल्ला घेणे असे कामकाज करावयाचे आहे. याबाबतचा अहवाल समितीने सात दिवसात सादर करावा.

ही रुग्णालये त्यांच प्रमाणे जिल्ह्यातील इतर सर्व कोव्हिड उपचारासाठी  विहित केलेल्या परंतु या आदेशाव्यतिरिक्त इतर सर्व रुग्णालयातील आग प्रतिबंधक व विद्युत पुरवठा यांची तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची व निधी उपलब्ध करुन घेण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या त्या रुग्णालयांचे जिल्हा प्रमुख यांची राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये व भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये कारवाईस पात्र राहील यांची नोंद घेण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आदेशात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.