इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

सीपीआर, आयजीएम आणि एस. डी. एच गडहिंग्लजचे ऑक्सीजन सिक्युरिटी ऑडीट करण्यासाठी समिती नियुक्त जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय):  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी आणि उप जिल्हा रुग्णालय गडहिंग्लज रुग्णालयातील ऑक्सीजन त्यात वाढ करण्यात येणाऱ्या पुरवठा यंत्रणेचे सुरक्षा ऑडीट करण्यासाठी (ऑक्सीजन सिक्युरिटी ऑडीट) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन समित्या नियुक्त केल्या आहेत.

       छत्रपती प्रमिलाराजे र्वोपचार रुग्णालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे बॉयोमेडिकल इंजिनिअर डॉ. वैजनाथ कापरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्‍पीपाटील, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवींद्र शेटे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे, बॉयोमेडिकल इंजिनिअर डॉ. वैजनाथ कापरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयासाठी यांत्रिकी मंडळचे कार्यकारी अभियंता सुभाष बागीवडे, गडहिंग्लज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्‍पीपाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गठित समितीस रुग्णालयात बसविण्यात आलेल्या जुन्या व नविन ऑक्सीजन पुरवठा यंत्रणेची सुरक्षा तपासणी करणे, ऑक्सीजन पुरवठा करणारी यंत्रणा जसे की, गॅस पाईप लाईन, गॅस प्लँट, गॅस आऊटलेट यांची वेळेवेळी पहाणी, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णालयास सूचना देणे व रुग्णालय प्रमुखाकडून अमलबजावणी करुन घेणे. ऑडीट मध्ये ज्या त्रुटी आढळल्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक नियमावली निश्चित करणे व उपाय योजना सूचविणे आणि त्रुटीची पूर्तता करण्यासाठी संबंधीत रुग्णालया प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्याकडून  त्रुटी पूर्तता करुन घेणे. आवश्यकतेप्रमाणे खासगी यंत्रणेकडून सल्ला व अंमलबजावणी करुन कामावर नियंत्रण ठेवणे.  

याबाबतचा अहवाल समितीने सात दिवसात सादर करावा. सुचविलेल्या उपाययोजनांबाबत अंमलबजावणीही करावी. समितीचे कामकाज व पत्रव्यवहार व इतर प्रशासकीय व तांत्रिक कामासाठी संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जबाबदार राहतील. समिती मार्फत सुचविण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाय योजनांची कामे करणे, अंदाज पत्रके तयार करणे, निविदा मागविणे व काम करुन घेण्यासाठी समितीस अधिकार प्रदान करण्यात येत आहे. समितीच्या मान्यतेनंतर संबंधित समिती अध्यक्ष, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम व यांत्रिकी मंडळ यांना निविदा मागविणे व पुढील काम करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

ही रुग्णालये त्यांच प्रमाणे जिल्ह्यातील इतर सर्व कोव्हिड उपचारासाठी  विहित केलेल्या परंतु या आदेशाव्यतिरिक्त इतर सर्व रुग्णालयातील ऑक्सीजन पुरवठा यंत्रणेची तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची व निधी उपलब्ध करुन घेण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या त्या रुग्णालयांचे जिल्हा प्रमुख यांची राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये व भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये कारवाईस पात्र राहील यांची नोंद घेण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आदेशात म्हटले आहे.

0  00 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.