इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

आपले सरकार केंद् स्थापन करण्यासाठी इच्छुक नागरिकांनी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावेत - उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे

 

  कोल्हापूर, दि. ३० (जिल्हा माहिती कार्यालय)- राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, नागरी सुविधा केंद्र तसेच संग्राम केंद्र यांना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देवून सर्व कॉमन सर्व्हीस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयातील सेतूच्या ठिकाणी (करवीर तालुका वगळून) आपले सरकार केंद्र स्थापन करावयाचे आहे. यासाठी 1 ते 31 मार्च 2020 या कलावधीमध्ये अर्ज करण्यात आले होते. कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर या कामास दि. 27 मार्च रोजी स्थागिती देण्यात आली होती. ही कार्यवाही पुन्हा सुरु करण्यात येत असून 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये इच्छुक नागरिकांनी अर्ज करावे, असे आवाहन उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावरु अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन घ्यावा. अर्ज दिलेल्या मुदतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेळेत स्वीकारण्यात येतील.  यापूर्वी दि. 1 ते 31 मार्च या कालावधीमध्ये अर्ज केलेल्या नागरिकांनी पुन्हा अर्ज करण्यची आवश्यकता नाही. सदर कालावधीतील अर्जांचा या प्रक्रीयेमध्ये समावेश करण्यात येईल, असेही श्री. गलांडे यांनी कळविले आहे.

 0 00 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.