इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

उत्पादन शुल्क विभागाचा छापा 3 लाख 26 हजार रुपायांची गोवा बनावटीची दारु जप्त



      कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) :  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील हेरे येथे आज छापा घातला. या छाप्यात 3 लाख 26 हजार 640 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली. 
      याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.
          विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अवैध दारु जप्त करण्यासाठी भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. आदर्श आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी अवैध मद्य विक्री, वाहतूक, साठा अशा ठिकाणी आणि सीमावर्ती भागात अवैद्य व्यवसायिकांवर या पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. चंदगड तालुक्यातील हेरे येथील राजेंद्र गवस यांच्या घरी अवैद्यरित्या विक्री करण्यासाठी गोवा बनावटीचा मद्य साठा असल्याची माहिती भरारी पथकास मिळाली. भरारी पथकाने आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकला असता, घरालगताच्या अडगळीच्या खोलीत प्लॅस्टीक ताडपद्रीच्या खाली गोवा बनावटीचा विविध ब्रँडचा विदेशी मद्य साठा आढळून आला. अवैध रित्या मद्यसाठा केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
          जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये हायवर्डस फाईन व्हिस्की, मॅकडॉल नं.1, गोल्डन एस.ब्ल्यू व्हिस्की, इम्पोरियल ब्ल्यू व्हिस्की, टुबर्ग बिअर या ब्रँडच्या 750 व 180 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले 58 बॉक्स आढळून आले आहेत. भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जनन्नाथ पाटील,किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.