इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

जनजागृती रॅली, प्रतिज्ञा व विविध स्पर्धेतून जिल्ह्यात मतदान जागृती -जिल्हाधिकारी दौलत देसाई









कोल्हापूर,दि.27 (जि.मा.का) : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हयात मतदान जागृतीचा विशेष कार्यक्रम प्रशासनाने गतिमान केला आहे. जिल्ह्यातील गावागावात, शाळा-महाविद्यालयामध्ये मतदार जागृतीचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे होत आहे. मतदारांकडून या जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदान जागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने पथनाटय, जनजागृती रॅली, संकल्प पत्र भरून घेणे, महिला व बचतगटांचे मेळावे यासह मतदान जागृतीपर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक, शाहिरी-पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 मतदार जागृती मोहिमेत समाजातील सर्वच घटकांचा सहभाग घेण्यात येत असून संपूर्ण कोल्हापूरवासियांनी मतदार जागृतीच्या कामात स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी म्हणाले, यंदा मतदान प्रक्रियेत सर्वांचाच विशेषत: महिला, युवा, दिव्यांग अशा मतदारांचा 100 टक्के सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध हायस्कूलच्या  मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे.
वृध्द असो की जवान सर्वांनी करा मतदान!
हातकणंगले शिक्षण विभाग अंतर्गत भादोले, वाठार, पारगाव, नागाव, हेर्ले व सावर्डे या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक यांनी संकल्प पत्र भरून घेऊन मतदानाची शपथ घेतली. राधानगरी तालुक्यातील केंद्र शाळा धामोड येथे संकल्प पत्र भरून घेऊन मतदान जागृती रॅली काढण्यात आली. करवीर तालुक्यातील वळीवडे येथे तसेच कायदा महाविद्यालयात युवा मतदारांसाठी,गगनबावडा तालुक्यातील आनंदी विद्यालयात,पंचायत समिती गगनबावडा व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मतदान प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले. वृध्द असो की जवान सर्वांनी करा मतदान! असा संदेश देत पाटपन्हाळा येथील द.रा. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थींनींनी मतदान जनजागृती रॅली काढली.
'नवे वारे नवी दिशा मतदान ठरेल उद्याची आशा', निर्भय होऊन मतदान करा अधिकाराचा सन्मान करा, चला मतदान करूया देशाची प्रगती करूया या घोषवाक्यांनी  पन्हाळ्यात मतदार जागृती करण्यात आली.  तालुक्यातील विद्या मंदिर दानेवाडी, विद्यामंदिर आरळे, विद्यामंदिर जाधववाडी या शाळांनी रॅली काढून तसेच चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य या  माध्यमातून जनजागृती केली. विद्यामंदिर जेऊर, विद्यामंदिर करंजफेण या शाळांनी प्रभातफेरी काढली. जय शिवराय हायस्कूल सातार्डे, विद्यामंदिर इंजोळे, कन्या व कुमार विद्यामंदिर माले, विद्यामंदिर तिरपन, विद्यामंदिर नाईक वसाहत जागली, शाहू हायस्कूल काटेभोगाव, कांदबरी हायस्कूल पोर्ले-बोरगाव, विद्यामंदिर बच्चेसावर्डे, विद्यामंदिर पिसात्रे, विद्यामंदिर देवाळे, विद्यामंदिर बांद्रेवाडी, विद्यामंदिर कसबा ठाणे, विद्यामंदिर पिसाळवाडी, रा.म.पाटील कुमार विद्यामंदिर कसबा ठाणे, विद्यामंदिर शहापूर या शाळांनीही रॅली काढली. गडहिंग्लज तालुक्यातील विद्यामंदिर बुगडीकट्टी येथे मानवी साखळी आणि पथनाट्याव्दारे जनजागृती करण्यात आली. कागल मतदारसंघामध्ये शाहीर राजेंद्र ढोरे व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर करून जनजागृती केली. तसेच चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि रॅलीच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली. करवीर आणि शिरोळ  मतदार संघातही रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.