इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

मतदार जागृतीसाठी जिल्हाभर पालकसभा, हळदी-कुंकू, विद्यार्थ्यांच्या रॅली





कोल्हापूर,दि.28 (जि.मा.का) : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आज चव्हाणवाडी येथील केंद्र शाळेत प्रशासनाच्यावतीने महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे तसेच पोर्ले येथील शाळेत पालकसभांचे आयोजन करण्यात आले. याबरोबरच जिल्हयातील सर्वच शाळांमध्ये मतदार जागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलींचेही आयोजन करुन घराघरापर्यंत तसेच घरातील प्रत्येकापर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्याचं काम होत आहे.
 प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, जिल्हयात येत्या 21 ऑक्टोबररोजी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुमीपेक्षा अधिक व्हावी, यासाठी मतदार जागृतीचे काम जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर प्रभावीपणे होत आहे. यामध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू, पालकसभा, पथनाटय, जनजागृती रॅली, संकल्प पत्र भरून घेणे, बचतगटांचे मेळावे तसेच रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्कतृत्व स्पर्धासह ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकांचे कार्यक्रमही होत आहेत.
मतदान जागृतीच्या उद्देशाने आज जिल्ह्यातील अनेक गावात तसेच शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये विद्या मंदिर चंदगड येथे पालक सभा, विद्यार्थ्यांची रॅली, रांगोळी तसेच चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यामंदिर नंदवाळ येथे मतदान जागृती रॅली काढण्यात आली. कुमार व कन्या विद्यामंदिर उचगाव येथे मतदान जागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीस सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. चव्हाणवाडी येथे स्वीप अंतर्गत पालकसभा व हळदी कुंकंवाचा कार्यक्रम संपन्न झाला, पोर्ले येथील गोसावी वसाहतीत मतदान जागृती पालक सभा झाली. बॅ. बाळासाहेब खर्डेकर विद्यामंदिरातही रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्री. शाहू प्राथमिक विद्यालय तोरस्कर चौक, विद्यामंदीर आरळे, विद्यामंदिर तळेवाडी, विद्यामंदिर पाटपन्हाळा, विद्यामंदिर कळे, विद्यामंदिर इटे, विद्यामंदिर पोहाळे, विद्यामंदिर उत्तूर, विद्यामंदिर नंदगाव, कुमान व कन्या विद्यामंदिर माले, विद्यामंदिर वाकरे अशा कित्येक गावात मतदान जागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलीज, महिला मेळावे, पालकसभा संपन्न झाल्या.
राजोपाध्येनगर येथील  मुन्यि. कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालयातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा. मतदान आपला हक्क आहे, तो वाया घालवू नका अशा घोषणा देण्यात आल्या. मतदार जनजागृतीसाठी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मुलांसाठी निबंधलेखन व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.