इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

निवडणूक खर्च सनियंत्रण यंत्रणा सज्ज चार खर्च निरीक्षक दाखल ; संपर्क क्रमांक जाहीर



            कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघासाठी चार खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून, त्यांनी खर्च विषयक सनियंत्रण यंत्रणेचा आढावा घेतला. खर्च विषयक निरीक्षक त्यांचे संपर्क क्रमांक आणि संपर्क अधिकारी जाहीर करण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी संजय राजमाने यांनी दिली.
       जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून चार खर्च निरीक्षक आणि जिल्हा‍ निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा स्तरावर निवडणूक खर्च संनियंत्रण समिती, माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (MCMC) तक्रार निवारण व मदत केंद्र तसेच बँक रिपोर्ट कमिटी या 4 प्रमुख समित्या तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्र स्तरावर एक सहाय्यक खर्च निरीक्षक (AEO) एक लखा पथक 3 व्हिडीओ सर्वेक्षण पथके, 2 व्हिडीओ पाहणी पथके, 3 ते 4 भरारी पथके आणि गरजेनुरुप स्थिर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
       भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून भरारी पथके व स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित झाली आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून निवडणूकीच्या कालावधीत हेाणारे सभा, मेळावे, पदयात्रा इत्यादी प्रकारच्या प्रचार प्रसिध्दी घटनांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी व्हिडीओ सर्वेक्षण पथके कामकाज करत आहेत. भरारी पथके निवडणूक काळामध्ये बेकायदेशीरपणे वाटप होणाऱ्या रोख रक्कम, दारु, भेटवस्तू व मतदारांना थाकदपटशा दाखवणे इत्यादी गोष्टीवर निर्बंध आणण्यासाठी मतदारसंघांमध्ये रात्रंदिवस गस्त घालत आहेत. विधानसभा मतदार संघातील प्रमुख रस्त्यांवर स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत असून निवडणूक काळामध्ये रोख रक्कम, दारु, भेटवस्तू, शस्त्रास्त्रे इत्यादीच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी कामकाज करत आहेत. याशिवाय पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग या तपास यंत्रणेचे नोडल अधिकारीही निवडणूक खर्च सनियंत्रणसाठी कामकाज करत आहेत.
          जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्ष यांच्यासोबत झालेल्या  बैठकीमध्ये निवडणूक खर्चाच्या विविध बाबींचा प्रारुप दर तक्ता जाहीर करुन त्यावर हरकती मागवल्या होत्या. दिनांक 23 सप्टेंबर रोजी प्राप्त हरकतींचा विचार करुन अंतिम दर तक्ता घोषित करण्यात आला आहे. विधानसभा क्षेत्र स्तरावरील निवडणूक खर्च नियंत्रणाची संबंधित विविध पथकांचे प्रशिक्षण दिनांक 13 सप्टेंबर  रोजी शासकीय विश्रामगृह आणि दुपारच्या सत्रात केशवराव भोसले नाट्यगृह येथे घेण्यात आले. सहाय्यक खर्च निरीक्षक आणि त्यांची लेखा पथकांचे दुसरे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 20 सप्टेंबर रोजी झाले.
           दिनांक 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व बँकांची बैठक घेऊन निवडणूक काळात होणारे संशयास्पद व्यवहार व त्यांचे दैनंदिन रिपोर्टिंग, रोकड वाहनाची प्रमाणित कार्यपध्दती इत्यादीवर चर्चा करण्यात आली. दिनांक 26 सप्टेंबर रोजी सर्व चार खर्च निरीक्षक विधानसभा मतदारसंघांमध्ये दाखल झाले असून, त्यांची राहण्याची व्यवस्था शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे.  निवडणूक काळात त्यांचा मोबाईल क्रमांक आणि संपर्क अधिकारी यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.   
          विधानसभा मतदारसंघ 271 ते 273 साठी शील आशिष  यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी 7447368646 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून दिपक बी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी 9970264296 असा आहे.
          विधानसभा मतदारसंघ 274 व 275 साठी आर. नटेश  यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा भ्रमणध्वनी 9359314054 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून दयानंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी  9404986840 असा आहे.
          विधानसभा मतदारसंघ 276 व 277 साठी शादाप अहमद यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा भ्रमणध्वनी 7820836663 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून दिपक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी  8975050100 असा आहे.
          विधानसभा मतदारसंघ 278 व 280 साठी जे. आनंद कुमार यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा भ्रमणध्वनी 7756095278 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून अमर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा भ्रमणध्वनी  9860610727 असा आहे.
          उमेदवारांनी त्यांचे निवडणूक खर्चाचे दैनंदिन लेखी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यरत सहाय्यक खर्च निरीक्षक व त्यांची लेखा पथके यांच्याकडे सादर करावयाची आहेत. या लेख्यांची तपासणी किमान तीन वेळा खर्च निरीक्षकांकडून होणार आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.