इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे पोलीस दलासाठी टपाल मतदानाची सोय - पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख





        कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) :  विधानसभेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलासाठी टपालाद्वारे मतदान  करण्याची सोय करण्यात आली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला टपालाद्वारे जास्ती जास्त मतदान होईल, याची दक्षता आम्ही घेत आहोत. येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.  
       राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अतिशय मुलभूत हक्क दिला आहे. मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा हक्क आणि कर्तव्य यामध्ये मतदानाचा हक्क अतिशय महत्वाचा आहे. आपला तो अधिकार आपण येत्या 21 ऑक्टोबर रोजी काळजीपूर्वक बजावावा, असे आवाहन करुन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख पुढे म्हणाले, नव मतदारांनी विशेष प्राथमिक लक्ष मतदानावर द्यावे. त्या दिवशी अन्य कामे थोडी बाजूला ठेवून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावे आणि मतदान करावे. 
            विधानसभा निवडणुकीच्या कामकाजामध्ये पोलीस अधिकारी आणि जवान आपले कर्तव्य बजावत असतात. अशा परिस्थितीत त्यांचेही मतदान व्हावे त्यासाठी टपालाद्वारे मतदानाची सोय करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा मतदानासाठी पोलीस दलाकडून जास्ती जास्त मतदान होईल, याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत, असेही डॉ. देशमुख यावेळी म्हणाले.
0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.