इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन




कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अधिष्ठाता, छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत जागतिक ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन उद्या मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ऑडिटोरिअम हॉल, सी.पी.आर.येथे करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी दिली.
         या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये बी.पी., डोळे, दात, कान, नाक, घसा, ऑर्थो, मानसोपचार, समुपदेशन, फिजिओथेरपी, देह/अवयव दान, हिमोग्लोबीन तपासणी, ह्दय तपासणी, रक्त व लघवी तपासणी इत्यादी तपासण्या घेण्यात येणार आहेत.  पोलिस विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांना मोफत कायदे सल्ला दिला जाणार आहे. एस. टी. महामंडळामार्फत ज्ये्ष्ठ नागरिकांकरिता सवलतीचे पास दिले जाणार आहेत. तहसिलदार  करवीर यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाच्या ज्या योजना चालू आहेत त्यांची माहिती दिली जाणार आहे.
            जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. कामत यांनी केले आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.