इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

जांभुळनेवाडीत मतदान प्रतिज्ञा तर पोवारवाडीत सायकल रॅली गांवागावात होत आहे मतदार जागृती




कोल्हापूर,दि.29 (जि.मा.का) : मतदान जागृतीसाठी आज दिवसभरात जांभुळनेवाडीत मतदान प्रतिज्ञा, इचलकरंजीत पथनाट्या तर शिंदेवाडीत महिलांची मतदान जनजागृती फेरी संपन्न झाली. याबरोबरच जिल्ह्यात गांवागावातून तसेच शाळामधून विद्यार्थ्यांच्या रॅली, रांगोळी तसेच चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, सायकल रॅलींचेही आयोजन करण्यात आले.
विधानसभा निवडणूकीत अधिकाधिक मतदारांनी घराबाहेर पडून भारतीय लोकशाहीने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा मतदार जनजागृतीपर कार्यक्रमांनी ढवळून निघाला आहे. गावागावात लोक मतदान जागृतीचे विविध कार्यक्रम करुन घराघरापर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्याचं काम करीत आहेत. आज दिवसभरात जिल्हयातील अनेक गांवात मतदार जागृतीपर पालकसभा, पथनाट्य, जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, मतदान प्रतिज्ञा, चित्रकला स्पर्धांचे कार्यक्रम घेण्यात आले.
मतदार जागृतीच्या उद्देशाने आज जिल्ह्यातील अनेक गावात तसेच शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, विद्यामंदिर कसबा ठाणे येथे जनजागृती रॅलीसह चित्रकला स्पर्धा, चंदूरच्या संजीवन विद्यामंदिराच्यावतीने प्रभातफेरी, इचलकरंजी येथे मतदार जागृतीपर पथनाटय सादर करण्यात आले, भुदरगड, विद्यामंदिर मोरेवाडी, विद्यामंदिर पडळ येथे रांगोळी स्पर्धा, केंद्रशाळा कोडोली येथे प्रभातफेरी, वारनुळ येथे चित्रकला स्पर्धा, जांभुळनेवाडी येथे मतदान प्रतिज्ञा तसेच पोवारवाडी येथे सायकल रॅली काढण्यात आली. मतदार जनजागृती प्रभातफेऱ्यामध्ये मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदानासाठी वेळ काढा, मतदान आपला हक्क आहे, मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, अशा घोषणा देण्यात आल्या.
00000
                            



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.