इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

राधानगरी धरणातून 400 क्युसेक विसर्ग जिल्ह्यात 1 बंधारा पाण्याखाली



 कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) :  राधानगरी धरणातून 400 क्युसेक विसर्ग सुरु आहे. कोयनेतून 2100 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 12.3 फूट होती. जिल्ह्यातील 1 बंधारा पाण्याखाली आहे.
राधानगरी धरणात आज अखेर 8.25 टीएमसी पाणीसाठा आहे.
 पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 123.081 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 105.15  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.45 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.39 टीएमसी, कासारी 2.76 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.69 टीएमसी, पाटगाव 3.69 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 12.3 फूट, सुर्वे 14.8 फूट, रुई 41 फूट, इचलकरंजी 37.6 फूट, तेरवाड 36.6 फूट, शिरोळ 29.6 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 17.3 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट अंकली 11.2 फूट अशी आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.