कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा
माहिती कार्यालय): दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा परिसराचे
सुशोभिकरण व आवश्यक कामासाठी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध करुन देण्यास
पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी
आज येथे केले.
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) देसाई यांनी आज दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी महापौर निलोफर आजरेकर,
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, शहर
अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह नगरसेवक
व नागरिक उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, दिवंगत बाळासाहेब
देसाई यांचा पुतळा परिसर सुशोभिकरण व आवश्यक कामासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव
वेळेत सादर करावा. नगरविकास विभागाकडून या कामासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी महापौर, आयुक्त यांच्या समवेत
नगरविकास विभागाकडे बैठक घेतली जाईल. दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या
पुतळा परिसरात स्वच्छता ठेवावी. जे कोणी परिसरात अस्वच्छता करतील त्यांच्यावर
महापालिकेने कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.