बुधवार, १ जुलै, २०२०

स्थलांतरीत कामगारांना मार्गदर्शन, समुपदेश करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे हे केंद्र प्रमुख




कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): - कोव्हिड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत कामगारांकरिता समुपदेशन / सुविधा केंद्र स्थापित करण्यात आलेली आहे. याचे केंद्र प्रमुख म्हणून इचलकरंजीच्या सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  
        सर्वोच्च न्यायालयाने स्थलांतरीत कामगारांकरीता करावयाच्या कार्यवाहीबाबत दिलेल्या निर्देशानुसार स्थलांतरीत कामगारांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी असणा-या विविध योजनांची माहिती उपलब्ध करुन देणे, त्यांचे विविध प्रश्न /अडचणी संदर्भात समुपदेश करण्यात येणार आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, राजाराम स्टेडियम, गेट. नं.3 बस स्टॅंड समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर याठिकाणी समुपदेशन /  सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच कामगार विभागामार्फत www.mahabocw.in  या संकेत स्थळावर स्थलांतरीत कामगारांकरीता स्वंतत्र विभाग सुरु करण्यात आला आहे.
0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.