कोल्हापूर,
दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : शहरामध्ये
रुक्मिनीनगर परिसरात हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर ते दत्त मंदिर वळण ते वायचळ
रोडवर ॲड. शहा यांच्या घर या अंतर्गत रस्त्यावर दोन्ही बाजूने दुचाकी व चारचाकी व
इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुक्मिनीनगर परिसारातील वाहतूक सुरळीत करणे व
नागरिक आणि पादचारी यांना रस्ते सुरक्षा प्रदान करणे आवश्यक आहे. मोटार वाहनासाठी
एकेरी वाहतूक आणि विरुध्द दिशेने येण्यास बंदी करण्यात येत असल्याचा आदेश पोलीस
अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख दिला आहे. आदेश दिनांक 2 ते 16 जुलै रोजी अखेर प्रायोगिक
तत्वावर राबविण्यात येत आहे.
वाहतूक नियोजनाबाबत नागरिका, रहिवाशी व वाहन
चालकांनी सहकार्य करावे. या विषयांबाबत सूचना अथवा हरकती असल्यास त्या शहर वाहतूक
नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडे जाहिरनामा प्रसिध्द झाल्यापासून 15
दिवसापर्यंत पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त सूचना अगर हरकती यांचा विचार करुन पुढील
निर्देश दिले जातील.
मार्ग :-
रुक्मिनीनगर परिसरात हॉटेल व्हिक्टर पॅलेस कॉर्नर ते दत्त मंदिर वळण ते वायचळ
रोडवर ॲड. शहा यांच्या घर असा प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांना हॉटेल व्हिक्टर
कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
तसेच ॲड. शहा यांचे घर ते हॉटेल व्हिक्टर पॅलेस
कॉर्नर हा मार्ग सर्व प्रकारच्या जड, अवजड मालवाहू वाहनांकरीता प्रवेश बंद राहिल.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.